लोणीची मानाची घागर प्रथा
भाविकांचे
श्रद्धास्थान असलेले कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील रेणुकामाता
देवीचा यात्रौस्तव चैत्र पौर्णिमेला च्या आदल्या दिवशी होत असून बऱ्याच
दिवसापासून खंडित असलेली लोणी येथील मनाची घागर नेण्याची प्रथा तरुणांनी
एकत्र येऊन पुन्हा एकदा सुरु केली आहे .मंगळवार दि.३ एप्रिल रोजी सायंकाळी
लोणी येथून चुन्याची हि घागर घेऊन तरुणांनी उक्कडगावकडे प्रस्थान केले.
कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील रेणुकामाता हि
देवी लोणी येथील विखे परिवाराचे कुलदैवत असून पूर्वी चैत्र पौर्णिमेच्या
अगोदर चुन्याची घागर नेण्याचा मान विखे परिवाराकडे होता.हि घागर उक्कडगाव
शिवेवर आल्यानंतर देवीच्या मंदिरासमोर असलेल्या दिपमाळा एकमेकीकडे झुकत आणि
हलत असल्याचे लोणी आणि उक्कडगाव येथील जेष्ठा कडून सांगितले जाते .
मात्र काळाच्या ओघात कावड आणि घागर नेण्याची प्रथा बंद झाली
असून कावड नेण्याचा मन कोपरगाव येथील भाविकांकडे देण्यात आला असता तरी
लोणी येथील तिसऱ्या युवकांनी आता एकत्र येऊन मंदिराच्या या प्रथेबाबत
विचारणा करून घर नेण्याची प्रथा या वर्ष पासून सुरु केली आहे.
No comments:
Post a Comment