श्री रेणुका मातेबद्दल दोन शब्द
सर्व भाविक जन -रेणुका मातेचा प्रकट काल सुमारे ४०० वर्ष पूर्वीचा मानला जातो.तिला कोणी रेणुका तर तांदुळजा म्हणतात .मातेचे प्रकट क्षेत्र उक्कडगाव ता.कोपरगाव जि.अहमदनगर आहे.मातेची पोथी तिचे भाविक महाराष्ट्र,गुजराथ येथील भागात आहेत त्या ठिकाणी यापूर्वी च्या आवृत्तीने भाविकांना उपलब्ध झाली आहे.या देवीची महती सांगावी तितकी कमी आहे.या मातेची फोटो जी तीन रूपे आपणास दिसत आहेत त्यातील पहिले जे तांदळ आहे आई तुळजाभवानी आहे आणि मधले जे तांदळ दिसते आहे ते रेणुकामातेचे रुप आहे व तिसरे तांदळ हे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे.आई स्वयंभू असून आपल्या भक्तच्या नवसाला पावणारी आहे.येथे वंश परंपरागत चालत आलेले पुजारी असून येथे संस्था स्थापन केले आहे. चे उत्सव साजरे केले जातात.गेल्या वर्षी पासून येथे पालखी सोहळ्याचे देखील नियोजन केले आहे .कै.श्री गोविंदराव मुळे यांना झालेल्या साक्षात्कारामुळे श्री रेणुका मातेचे पारायण ग्रंथाचे लिखाण पूर्ण करणे शक्य झाले.मातेची सर्वांवर मायेची पाखर राहावी हिच आई चरणी प्रार्थना.
!! श्री !!
!!हरी ओम !!
श्री गणेशाय नम:!विद्या देवता सरस्वती वंदन करुनी ! गुण गाई श्री कुलस्वामिनी माते !!१!!दिन आजचा शुभ स्फुर्तीदायी ! वंद्य जी शिवरायांची भवानी आई !जैसे राहिले तिचे कृपा छत्र !तैसी रक्षी माता सर्वासी !!२ !!अंबा माता अमरावतीची !सप्तश्रुंगी गडावरची !कोल्हापूरची महालक्ष्मी ! धुळे शहरीची श्री एकवीरा !माहूरगडच्या रेणुकामाता !!३ !!स्मरण शुद्ध भावाने करुनी !शेगावीचे श्रीं ना वंदूनी!पुत्तपर्थीच्या साईरामाची आशाधारूनी ! पितृछायेचा विश्वास ठेवूनी !!४!!मातृदेवतेचा आशिष पाठी घेवूनी ! करतो रचना स्रोताची ! कुलस्वामिनी शांत मनी !!५!! श्री कुलस्वामिनी स्थिरावली उक्कडगावात!!कोपरगाव तालुक्यात !नगर जिल्ह्यात महाराष्ट्रप्रदेशी !!६!!नांव जिचे भक्तीने वदती ! श्री रेणुका माता !उपाख्य नामे कुणी श्रीं तांदुळजा ओळखता!!७!! मत प्रकट कहाणी आहे फार जुनी ! १५ व्या शतकात ! एक होता शेतकरी राबत! शेत नांगरुनी करावी पेरणी !कुटुंबाचे करीत असे पोषण !!८!! एके वर्षी ऐसाची घेवूनी नांगराचा फाळ ! नांगरण्या आला पाहुनी सकाळ !सर्वे नं.७९ त ! उक्कडगाव शिवारात !!९!! शेत नांगरताना एके ठिकाणी शेतात अडकला फाळ !कष्ट त्याचे होती विफल ! काढण्यासी तो फाळ दिसली मूर्ती तात्काळ !!१०!! प्रयत्ने काढावी मूर्ती वर ! ऐसा करूनी विचार ! बसला बैल सोडूनी क्षणभर ! प्रयत्न करता मूर्ती निघेना वर!!११!! विचार मनी करूनी ! इतरांची घ्यावी मदत म्हणुनी ! निघाला गांवात तोची जाहला दृष्टांत !!१२!! जातोस तू गांवाकडे ! नकोस बघू उलटूनी मजकडे ! येणार नाही वर ! तू बघितलेस उलटूनी जर!!१३!!हे ध्यानी नच घेता ! होईल नाश तुझा बघता ! शेतकरी चालू लागला न बोलता ! परी दुर्गुण शत्रू माणसाचा !!१४!! मोह उलटूनी बघण्याचा जाहला ! भंग जाहली विचारमाला ! साक्ष ठेऊन वाचनभंगाला ! राहिली माता अर्धी जमिनीत !!१५!! नच साधिले हित शेतकर्याचे प्रयत्न करूनी ! काही वेळातच निवेदून सर्वांस ! गमन केले मृत्युलोकी शेतकर्याने !!१६!! माझ्या मातेचे प्रकट कहाणी ध्यानी घ्यावी सर्वानी ! प्रकटवृत्त मातेचे कळूनी ! छत्र केले तात्पुरते गावकर्यानी!!१७!! मातेचे शिरावरी जाहली छाया ! ठेविली तिने सर्वांवर माया ! शब्द रेखुनी प्रकट निवेदिले ! प्रथम अध्यायी आजचे दिनी बहुसंतोष शरदने ऐसे !
!!इतिश्री प्रथमोध्याय संपूर्ण !!
!! अध्याय दुसरा !!
श्री गणेशाय नम:! वंदुनी रेणुकामाते ! होते पुलकित मन प्रकट वृत्ते ! सर्वे नं.७९ होती सनदेने मिळाला ! गावातील गुरव लोकांना !!१!! त्यांनी खेडावे शेतास ! बेलपत्रे द्यावी पुजेस ! मंदिरी देखभाल करावी बदल्यात ! ऐसे ठरले अलिखित !!२!! गुरव लागले भक्ती कार्याला ! ना ठेविली जागा दोषाला ! चालले ऐसे दीर्घकाळ ! ऐसे मातेच्या इच्छेपरी !!३!! ऐक म्हण प्रचलित ! गाव करी ते राव न करी ! जमले पंचक्रोशीतील गांवकरी ! ठेवुनी इच्छा मनी !!४!! मातेचे मंदिर अल्प बांधुनी ! मातेच्या अर्पावे चरणी ! आले नच संकट त्या बांधावा ! झाले इच्छेपरी सर्वांचे !!५!! मातेची मूर्ती आहे २ फूट उंचीची ! मोहक शेंदूर विलेपित ! जेथून प्रगटली तिचे भोवती बांधुनी मंदिर ! शोभा वाढली तिची !!६!! मूर्ती शेजारी दोन्ही बाजूस ! स्वयंभू दोन हात ! जे आहेत शेंदूर विलेपित ! वस्र असते तिची पदर रुपात !हातावरी दिसतसे !!७!! मंदिराचे प्रवेशद्वार घडविले घोटीव दगडांनी ! नच केली कुचराई कारागिरांनी ! चारशे वर्ष रक्षती वार्यापासुनी सत्क्तुत्य मानुनी ! कर्तव्य मातेचे चरणी !!८!! मंदिरापुढती आहेत दोन दिपमाळ !शोभा दिसते सांजसकाळ ! मोहुनी घेती पांथिकास! आपल्याच वैभवे !!९!! पहिला टप्पा आहे ठेवूनि दगडावर दगड ! बनविला सुबक कारागिरे ! लेख आहे त्या शिलेत ! कोरीव अक्षरे 'श्री रेणुका माता प्रसन्न'त्या पुढील लेखन वेगळ्या न उमजे सामन्यासी!!१०!! टप्पे चार हि बांधलेले दोन इंची पक्क्या विटेत ! दिसते सुरेख दीपमाळ ! पूर्ण गोलाकृती बांधली ! पणास कसब लावूनी !!११!!दुसरी दीपमाळ पाच टप्प्यांची बांधणी ! प्रथम आहे चौकोनी ! दुसरा तर षटकोनी ! पुढील तीन गोलाकार करुनी !! विस्मित केले समस्त जनी !!१२!! दीपमाळेखाली विस्तीर्ण ओटे बांधले भाविकांस आपुल्या विश्रांती साठी ! रस्ता दीपमाळेवर जाण्या ठेविला नि:संशय आतुनी ! ऐसे शोभा वाढवली मंदिराची !!१३!! मंदिरी विशेष उत्सव असतो ! गुढीपाडवा , हुनुमान जयंती व आश्विनमासी ! नवरात्रापासुनी विजयादशमी पर्यंत ! मोठ्या भक्तीभावे ! आनंदाने !!१४!! चांदीची जर पैठणी नेसविली जाते विशेष दिनी ! माझ्या मातेसी भक्तीने ! ज्ञात होण्या भक्ताने !!१५!! चैत्र शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा ! भरते मोठी यात्रा दरवर्षी ! हजारोंनी होते उलाढाल !

No comments:
Post a Comment