Friday, 3 February 2012

रेणुका माता



उक्कडगाव कुठ आहे अस म्हणत असाल ? तर चला आम्ही तुम्हाला आज या छोटयाश्या गाव बद्दल माहिती सांगतो.उक्कडगाव हे महाराष्ट्राच्या म्हणजेच आपल्या प्रिय शिवरायांच्या पावन भूमीत अहमदनगर जिल्ह्यात आणि कोपरगाव पासून २२ कि.मी अंतरावर आणि वैजापूर तालुक्यापासून पासून फक्त ६ कि.मी च्या अंतरावर वसलेलं आहे .हे गाव अहमदनगर-नाशिक-औरंगाबाद अशा या तीन  जिल्ह्यांच्या सीमेवर आहे.या  गावास व्यापार,उद्योग,बाजार वैजापूर हे शहर जवळ असल्याने या शहराकडे वाटचाल जास्त आहे.हे गाव सपाटीवर आहे आणि कमी पाउसाच्या पट्यात येतो त्यामुळे येथील शेती जिरायात आहे.येथील मुख्य पिके म्हणजे कापूस उत्पादन आहे.अस उक्कडगाव हे प्रचलित आहे ते तेथील स्वयंभू रेणुका मातेच्या मंदिरामूळे !  हे मंदिर गावापासून१ कि.मी बाहेर आहे.अशा साडेतीन शक्तीपीठ असलेल्या रेणुका मातेचे महात्म्य सांगावे तितक कमी आहे.
                  सर्व भाविक जन -रेणुका मातेचा प्रकट काल सुमारे ४०० वर्ष पूर्वीचा मानला जातो.तिला कोणी रेणुका तर तांदुळजा म्हणतात .मातेचे प्रकट क्षेत्र उक्कडगाव ता.कोपरगाव जि.अहमदनगर आहे.मातेची पोथी तिचे भाविक महाराष्ट्र,गुजराथ येथील भागात आहेत त्या ठिकाणी यापूर्वी च्या आवृत्तीने भाविकांना उपलब्ध झाली आहे.या देवीची महती सांगावी तितकी कमी आहे.या मातेची फोटो जी तीन रूपे आपणास दिसत आहेत त्यातील पहिले जे तांदळ आहे आई तुळजाभवानी आहे आणि मधले जे तांदळ दिसते आहे ते रेणुकामातेचे रुप आहे व तिसरे तांदळ हे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे.आई स्वयंभू असून आपल्या भक्तच्या  नवसाला पावणारी आहे.येथे वंश परंपरागत चालत  आलेले पुजारी असून येथे संस्था स्थापन केले आहे. चे उत्सव साजरे केले जातात.गेल्या वर्षी पासून येथे पालखी सोहळ्याचे  देखील नियोजन केले आहे .कै.श्री गोविंदराव मुळे यांना झालेल्या साक्षात्कारामुळे श्री रेणुका मातेचे पारायण ग्रंथाचे लिखाण पूर्ण करणे शक्य झाले.मातेची सर्वांवर मायेची पाखर राहावी हिच आई चरणी प्रार्थना.
                    या मातेची महती म्हणजे आख्यात भक्तांची अफाट निष्ठा आहे.कारण भक्त खरुज,नायटे,बेंड या सारखे आजार तिला नवस करून पूर्ण करतात आणि आई जगदंबा हि नवस पूर्ण करून आपल्या भक्तांना आपल्या मायेच्या सावलीत घेते असे मानले जाते .देवीचा नवस निम्बाचा पाला नेसून पूर्ण केला जातो.चैत्र पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते .या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेला हा नवस भाविक भक्त येऊन पूर्ण करतात.नवरात्रीचे नऊ दिवस यात्रे ला तर खूप दूरवरून हजारो भाविक भक्त आपली हजेरी लावून जगद्म्बेचा आशीर्वाद घेतात.आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मोठा होम केला जातो व म्हैशासुरचा बळी देऊन शिवावर ठेवतात.अशी रेणुका मातेची महती सांगावी तितकी कमी............!










जवळील रेल्वे स्थानक

No comments:

Post a Comment